लातूर : महिलांसाठी 8 मार्च हा विशेष दिवस मानला जातो. त्यांच्या समान हक्कांना आणि समानतेला प्रोत्साहन देते. त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकतो आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देतो. या दिवशी विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जगभरातील महिलांना सामाजिक, आर्थिक आणि राजकियदृष्ट्या सक्षम बनवण्यावर भर दिला जातो.
महिला दिनाच्या माध्यमातून लोकांना महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिली जाते. हा दिवस महिलांवरील गैरवर्तन, समाजातील त्यांची भूमिका आणि त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करतो. म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज युवा प्रतिष्ठान, लातूर यांच्या तर्फे ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. अजित कव्हेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन दिग्विजय शेळगे यांनी केले आहे
