औसा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरफळ येथे दि. 6-3-2025 रोजी वार गुरुवार विज्ञान आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. स्काऊट गाईडच्या संचलनाने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
भारतीय शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजन , दीपप्रज्वलन करुन अविष्कार फलकाची फीत कापून मान्यवरांनी प्रत्यक्ष प्रयोगाला भेट देऊन सूक्ष्म निरीक्षणातून प्रयोगाची पाहणी केली वर्ग पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून 151 प्रयोगाचे स्टॉल मांडणी केली होती. प्रत्येक जण तळमळीने आपल्या प्रयोगाचे सादरीकरण करण्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन मान्यवर पाहत असताना प्रत्येक विद्यार्थी आपल्या प्रयोगाचे सादरीकरण करत होते. ज्वलन प्रश्नावर आधारित विविध प्रयोगाचे स्टॉल रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वच्छ गाव सुंदर गाव, वाहतूक नियंत्रण हवेचा दाब, ट्रॅफिक सिग्नल, रोबोट, एटीएम मिशन, तरंगता लिंबू, हवेचा दाब, स्वच्छ पाणी, ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज, अदृश्य नाणे, कचऱ्याचे व्यवस्थापन, पवनचक्की, सांकेतिक भाषेचा उपक्रम, गणिती ओळख टाकाऊ पासून टिकाऊ, चंद्रयान-3, नैसर्गिक शेती मॉडेल, सौर ऊर्जा मॉडेल, कुलर, ज्वालामुखी, एलईडी टीव्ही, डान्सिंग बलून, रॉकेट, हवेच्या दाबावर लिफ्ट, जलशुद्धीकरण, सौरमंडल प्रतिकृती, पाण्याचे वहन, रेम्बो टावर, सोलर पावर, फुफसाचा नमुना ,कडबा कुट्टी, चुंबकीय स्प्रिंग, सिद्धेश्वर यात्रा, प्रकाश संश्लेषण, बाईक कार, हॅन्ड मिक्सर, ग्रास कटर, धूम्रपानाचे दुष्परिणाम, इलेक्ट्रिकल कार, परिदर्शी, स्मार्ट सिटी, न्यूटन तबकडी, एअर पोल्युशन मॉडेल, मजेदार आरसे, न्यूटन तबकडी, आर्किमिडीज स्क्रू, सूक्ष्मदर्शिका, ठिबक सिंचन, पृथ्वी वाचवा, ग्लोबल वार्मिंग, वर्किंग मॉडेल, होलोग्राम 3 थ्रीडी मॉडेल, आधुनिक शेती, भूकंप ओळखण्याची यंत्र, शोभा दर्शक, वीज निर्मिती, हवेवर दाबावर जीसीबी, ड्रोन गरीबाची कुलर इत्यादी प्रयोगाचे सादरीकरण शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणामध्ये केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक शि.प.चेअरमन खिचडे साहेबांनी सातत्याने 11 वर्षांपासून विज्ञान प्रदर्शन भरवणारी जिल्ह्यातील एकमेव शाळा याचा मला खूप अभिमान वाटतो व सर्व विद्यार्थ्यांना व तसेच गुरुजनांना पाठीवर शाबासकीची थाप दिली.मंचावरील प्रमुख अतिथी केंद्रप्रमुख शेख हुसेन साहेबांनी भविष्य काळामध्ये या गावातील शास्त्रज्ञ तयार होतील असा गौरव उद्गार आपल्या भाषणात काढले.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच सुरेखा ताई बजरंग जमादार, औसा मा.गटशिक्षणाधिकारी राठोड साहेब उद्घाटक पतसंस्थेचे चेअरमन श्री महादेवजी खिचडी साहेब, पतसंस्थेचे सचिव जगताप साहेब, केंद्रप्रमुख जनाब शेख हुसेन साहेब, केंद्रीय मु.अ शेख साहेब, माजी मु.अ.जंगाले साहेब, खुंटेगावचे मु.अ.शेख साहेब, गावचे उपसरपंच, संचालक युसुफ पिरजादे सर, संचालक रोडगे सर, मु.अ.सय्यद साहेब, मु.अ पांढरे साहेब, मु.अ.समद साहेब, मु.अ.चामे साहेब, मु.अ.बिराजदार साहेब, मु.अ.चव्हाण साहेब, रवी सर, आलमला केंद्रीय मु.अ.व सर्व मुख्याध्यापक, मुरमे सर, अनंतवार सर, शेळके सर, माने सर, भोसले सर, रवी भोसले साहेब, भुजबळ सर इ. अंकुश यादव शा.व्य.समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला शाळेतील माजी विद्यार्थिनी इ. यांचा उत्स्फूर्त असा सहभाग होता.
संचालक रोडगे सरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनंत मुळे सर, कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख श्री धिरजकुमार रुकमे सर, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे मु.अ श्री आरदवाड साहेब यांनी केले.
स्काऊट गाईड संचलन-कोळी मॅडम
फलक लेखन-श्रीम. जगताप मॅडम, श्रीम इनामदार मॅडम, रांगोळी -श्रीम.पवार मॅडम श्रीम जगताप मॅडम, कु.अजगुंडे मॅडम,
आविष्कार फलक तयार करणे-श्रीम. पवार मॅडम, प्रयोगाचे परीक्षण-श्री माने सर. शाळेतील विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी कठोर परिश्रम घेतले.
