औसा : शहरांमध्ये विविध खात्याच्या शासकीय इमारतीमुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे शहरातील पंचायत समिती ग्रामीण रुग्णालय दिवाणी न्यायालय नवीन बस स्थानक पोलीस स्टेशन नगरपरिषद कार्यालय अशा अनेक शासकीय इमारती शहरात डौलाने उभ्या आहेत मागील अनेक दिवसापासून औसा शहरातील केंद्र सरकारच्या आखत्यारीतील पोस्ट ऑफिस च्या इमारती अभावी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पोस्ट ऑफिस चा कार्यालयीन कामकाज भाड्याच्या इमारतीमध्ये करावा लागत होता त्यामुळे कर्मचाऱ्यांची कुचंबना सुरू असल्याने अनेक वेळा पाठपुरावा करूनही या कार्यालयाच्या इमारतीचे काम रखडले होते औसा शहरातील जागृत नागरिकांनी पोस्टाच्या इमारती संदर्भात अनेक वेळा मागणी करूनही या कामाकडे दुर्लक्ष होत होते शहरातील पोलीस स्टेशनच्या समोर ची जागा टपाल कार्यालयाच्या मालकीची असूनही बांधकाम रखडले होते परंतु नागरिकांची आता प्रतीक्षा संपली असून पोस्ट ऑफिस चा कार्यालयीन कारभार आता नवीन सुसज्ज इमारतीमध्ये सुरू होणार आहे पोस्ट ऑफिसच्या नूतन भव्य आणि इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून असा शहराच्या वैभव आत भर घालणाऱ्या या नवीन वास्तूमुळे आता टपाल कार्यालयाची दुरवस्था दूर होण्यास मदत होणार आहे.
- October 27, 2024
0
4
Less than a minute
You can share this post!
editor