औसा : दि.06 डिसेंबर 2024 रोजी श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे माध्यमिक विद्यालय फत्तेपुर येथे महामानव,संविधानाचे शिल्पकार ,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य संस्थेचे कोषाध्यक्ष श्री दयानंद चौहान साहेब यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यास दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिकुल परिस्थितीत शिक्षणाची कास धरुन सामाजिक,आर्थीक,साहित्यिक , क्षेत्रात ठसा उमटवला.आणि जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान भारतास अर्पण केले.अशी माहिती संस्थेचे कोषाध्यक्ष साहेबांनी दिली.याप्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ.चौहान मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक साहेब श्री मुळे सर,सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
- December 6, 2024
0
3
Less than a minute
You can share this post!
editor