लातूर : परमपूज्य विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवशी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व विचारमंथन करण्यात आले. याप्रसंगी भटके विमुक्त संघटनेचे राष्ट्रीय सचिव हरिभाऊ गायकवाड यांनी त्यांच्या मनोगतात म्हणाले आज बाबासाहेब आमच्या मध्ये नाहीत आमच्या मधून निघून गेले असे समजू नका बाबासाहेबांचे विचार आज आम्हाला माणूस म्हणून जगण्याची व विचारांची संधी दिलेली आहे बाबासाहेबांना इथल्या सनातन्यांनी सळो की पळो करून जगणे कठीण करून सोडले होते शिक्षणाची बंदी रोटी बेटी बंदी कुत्र्या मांजरांना मान मिळायचा पण आम्हा भटक्या मुक्तांना आणि आजच्या दलितांना खालच्या पातळीची हीन वागणूक सनातन वाल्याने दिलेली आहे या सनातन वाल्यांच्या जात दांडग्या धर्म दांडग्या अन्याय अत्याचाराला कंटाळून भारत देशातील लाखो करोडो भारतीयांना एकत्र करून आपला पूर्वज महात्मा गौतम बुद्ध यांचा विचार पुढे आणून आम्हाला बुद्धम् शरणम् गच्छामि धम्मम शरणम गच्छामि म्हणून पंचशीला चा विचार आम्हाला बहुजनाला दिलेला आहे म्हणून आम्ही बाबासाहेबांना आमच्या मधून गेले असे आम्ही कधीच समजलो नाही आणि पुढे सुद्धा समजणार नाही आज आम्ही सनातन्यांपासून हजारो लाखो किलोमीटर दूर आहोत बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांनीच जातिवाद उंच नीच वर्णव्यवस्था निर्माण केलेला आहे हे त्यांनी विसरू नये आमचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज महात्मा बसवेश्वर संत कबीर संत रोहिदास राजर्षी शाहू छत्रपती महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले मल्हारराव होळकर अहिल्यादेवी होळकर विठोजी होळकर यांना ह्या सनातन्यांनी काय कमी सूड घेतले आहे काय म्हणून वरील महापुरुषांनी विविध पंथ निर्माण केले या सनातन्याना कंटाळून वैतागून सोडून देऊन चारशे वर्षाच्या काळ संपलेला असून सुद्धा आज या सनातन वाल्यांना कंटाळून मराठा समाज बांधवांनी विज्ञानवादी शिवधर्म संकल्पनेच्या विचारावर गेल्या 35 वर्षापासून शिवधर्म स्थापन केलेला आहे याचा विचार सनातन्यांनी केला पाहिजे सत्तेसाठी देश तोडू नये असे विचार हरिभाऊ गायकवाड यांनी याप्रसंगी व्यक्त केले बाबासाहेबांना अभिवादन करत असताना राष्ट्रवादी राष्ट्रप्रेमी मुस्लिम ओबीसी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय मकबूल भाई वलांडी कर माननीय सुतार साहेब रवी कांबळे जी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
- December 6, 2024
0
6
Less than a minute
You can share this post!
editor