औसा : – ईद ए मिलादुन्नबी निमित्त इस्लाम धर्माचे प्रेषीत हजरत मुंहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे औचित्य साधत मुस्लिम समाजाच्या तरुणांच्या वतीने अनावश्यक बाबींना फाटा देत ईद -ए -मिलादुन्नबीचे अवचित साधून रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून हे इबादत आणि जिवन दानही आहे. या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे औसा शहरातील हसीना ऊर्दू गर्ल्स स्कूल येथे दि. १६ सप्टेंबर २०२४ सोमवार रोजी सकाळी ११ : ०० ते ०५ : ०० वाजेपर्यंत रक्तदान शिबीर कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमास याप्रसंगी खा.ओमराजे निंबाळकर, अजित पाटील कव्हेकर, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, माजी आमदार दिनकर माने, संतोष सोमवंशी, काॅग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अमर खानापुरे, सुरेश भुरे, वसीम खोजन, बालाजी साळुंखे,अनिस जहागीरदार, नियामत लोहारे, खुंदमीर मुल्ला,खाजा शेख, नदीम सय्यद यांच्यासह आदी जण उपस्थित होते. या शिबिरामध्ये 45 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले. रक्तदान केलेल्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात संजिवनी ब्लड सेंटर लातुचे रुतुजा सुर्यवंशी, प्रतिभा शेळके, निता साळुंखे यांच्या टिमने सहकार्य केले. हा रक्तदान शिबीर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी साहिल सय्यद, अरबाज पठाण, अशरफ सय्यद, खाजा शेख, शादाब हऩ्नूरे, नेमत अण्णा अलुरे, अल्ताफ सय्यद, आदीनी परिश्रम घेतले.

- September 17, 2024
0
16
Less than a minute
You can share this post!
editor