औसा : मा.आ. शिवसेना जिल्हाप्रमुख दिनकर माने यांनी मौजे जोगन चिंचोली येथे धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेले मौजे जोगन चिंचोली येथील मारूती मंदिर चौकात पेवर ब्लॉक या कामाची पाहणी केली.
तसेच ग्रामस्थांशी भेटून गावातील सर्व समस्या अडचणी संदर्भात चर्चा केली.
यावेळेस उपस्थित उपजिल्हा प्रमुख संतोष सुर्यवंशी, माजी नगरसेवक विवेक मिश्रा, उपतालुका प्रमुख प्रदीप क्षीरसागर, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर चिल्ले,शहर संघटक सचिन पवार, सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
बालाजी बिराजदार, भीमाशंकर बिराजदार, सुनील भुजबळ, सिद्धेश्वर पाटील, गंगापूरे महाराज, सुनील पाटील, दयानंद कोंडमगिरी, दत्ता पाटील मा सरपंच आदी शिवसैनिक, ग्रामस्थ, शिवसेना शाखा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
