किल्लारीच्या सरपंच सुलक्षणा बाबळसुरे नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित

किल्लारीच्या सरपंच सुलक्षणा बाबळसुरे नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित

स्त्रीला समाजात समानतेचा दर्जा मिळावा व विकासाची नवनवीन क्षितिजे खुली व्हावीत

औसा : सा ज्ञानांकुश वृत्तपत्राच्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात येणारा नवदुर्गा पुरस्कार‌‌‌ किल्लारीच्या लोकनियुक्त सरपंच सुलक्षणा बाबळसुरे व येळवटच्या सरपंच केशरबाई लाळे आणि सिरसलच्या सरपंच सुमन पाटील यांना प्रदान करण्यात आला.
तेरणा-मांजरा नदीच्या खोऱ्यातील आपल्या राज्याच्या उत्पादनाचा भाग प्रजेला समान वाटप करणारी स्त्रीराज्याची महाराणी म्हणजे तुळजा ! (तुला म्हणजे मोजणे, मापने ) तुळजा म्हणजे आपल्या राज्यात समानता आणणारी व समान वाटप करणारी महामाता होय. तिची राजधानी तुळजापूर आहे. पंचगंगेच्या खोऱ्याची महाराणी म्हणजे अंबाबाई होय. या सर्व कर्तृत्ववान, हिम्मतवान, महाबुद्धिमान, सृजनशील, नवनिर्मिती करणाऱ्या, सकल मानव समूहाचे पालन-पोषण करणार्‍या महामातांचा आदर-सन्मान म्हणजेच घटस्थापना नवरात्र उत्सव होय. घटस्थापना, नवरात्र म्हणजे तमाम स्त्रियांचा आदर-सन्मान करणारा सण-उत्सव आहे.!आपण घटस्थापना करतो, नऊ दिवस देवीचा उत्सव करतो. हा स्त्री संस्कृतीचा आदर आहे. महिलांनी सर्व मानवी समूहाला भटक्या अवस्थेतून मुक्त करून एक खात्रीलायक, सुरक्षित आणि हमी असणारे दर्जेदार जीवन बहाल केले. म्हणून तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच या नवदुर्गा पुरस्काराचे आयोजन सा ज्ञानांकुश वृत्तपत्राच्या वतीने करण्यात आले आहे असे अनिल जमादार यांनी किल्लारी ग्रामपंचायत येथे नवदुर्गा पुरस्कार‌‌‌ वितरणप्रसंगी आपले मत व्यक्त केले.
यावेळी मंचावर संपादक वामन अंकुश, पत्रकार विश्वनाथ गुंजोटे, अनिल जमादार, मंगल कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
किल्लारीच्या लोकनियुक्त सरपंच सुलक्षणा बाबळसुरे व येळवटच्या सरपंच केशरबाई लाळे आणि सिरसलच्या सरपंच सुमन पाटील यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक संच देवून नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ग्रा. पं. सदस्य सुमन भोसले, वैशाली विश्वनाथ गुंजोटे, मुबीन शिरगापुरे, विजय माने व ग्रामस्थ माया बाबळसुरे, ज्योती बाबळसुरे,विजयकुमार भोसले, साहेबराव बाबळसुरे, शाहुराज वाळके, पांडुरंग भोसले, लालू पठाण, सचिन सरवदेधनराज बाबळसुरे यांची उपस्थिती होती.

editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *