लातूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. रमेशआप्पा कराड हे मंगळवार दि २९ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्रीय माजी अर्थराज्यमंत्री खा. भागवत कराड यांच्यासह महायुती मान्यवरांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राज्यातील महायुती शासनाच्या माध्यमातून भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील गावागावात वाडी वस्तीत विविध विभागाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्चाच्या अनेक योजना मंजूर केल्या, वैयक्तिक लाभाच्या विविध योजनेचा गरीब आणि गरजू लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळवून दिला आहे. यामुळे भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच अनेकांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. या मतदार संघात हक्काचा आमदार या भावनेतून आ. रमेशआप्पा कराड यांना सर्वत्र मोठे समर्थन मिळत आहे.
केंद्रीय माजी अर्थराज्यमंत्री खा. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे उमेदवार आ. रमेशआप्पा कराड हे मंगळवार २९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी दहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असून याप्रसंगी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, गोपीनाथ मुंडे ऊसतोड विकास महामंडळाचे अध्यक्ष गोविंदअण्णा केंद्रे, शिवसेना नेते बालाजी काकडे, जिल्हा संपर्कप्रमुख अँड. बळवंतराव जाधव, प्रदेश रिपाईचे चंद्रकांत चिकटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अँड. व्यंकट बेद्रे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाणे, जिल्हाध्यक्ष अफसर बाबा शेख, रिपाईचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांच्यासह भाजपा व मित्रपक्ष महायुतीतील सर्व मान्यवर नेत्यांसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तेव्हा लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), रिपाई यासह महायुतीतील सर्व मित्र पक्षाच्या पक्ष पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान लातूर ग्रामीण विधानसभा महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.