लातूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार आ. रमेशआप्पा कराड यांचा केंद्रीय माजी अर्थराज्यमंत्री खा भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. लातूर ग्रामीण मतदारसंघात रमेशआप्पा कराड यांनी केलेल्या विविध विकास कामाची पावती मतदार जनता देणार असून विजय आपला निश्चित आहे तेव्हा कार्यकर्त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने जिद्दीने कामाला लागावे असे आव्हान केंद्रीय माजी अर्थ राज्यमंत्री खा. भागवत कराड यांनी केले.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात गावागावात वाडी वस्तीत केलेल्या विविध विकास कामाच्या आधारावर यावेळी निश्चितपणे परिवर्तन होणार असून भाजपा महायुतीचे उमेदवार आ रमेशआप्पा कराड यांनी मंगळवारी अत्यंत साध्या पद्धतीने आपला उमेदवारी दाखल केला यावेळी केंद्रीय माजीमंत्री खा. भागवत कराड, शिवसेना संपर्कप्रमुख अँड बळवंत जाधव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अफसर बाबा शेख, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाणे, रिपाई जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत सोट, शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, माजी जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गोडभरले, प्रदीप पाटील खंडापूरकर, पंचायत राज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे, रेणापूर तालुका अध्यक्ष दशरथ सरवदे, लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, राष्ट्रवादीचे विनोद आंबेकर, अमोल पाटील, त्र्यंबकआबा गुट्टे, अशोक काका केंद्रे, महेंद्र गोडभरले, वसंत करमोडे, वैभव सापसोड, सतीश आंबेकर, हनुमंत बापू नागटिळक, अभिषेक आकनगिरे, डॉ बाबासाहेब घुले, साहेबराव मुळे, पद्माकर चिंचोलकर, सुरज शिंदे, विजय काळे, बापूराव चामले, अमर चव्हाण, संजय ठाकूर, उमेश बेद्रे, अनंत चव्हाण, प्रताप पाटील, समाधान शितोळे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे) किसान मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर लहाने यांनी आपल्या असंख्य सहकार्यासह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रीती बुलबुले, शेख नसीमा, माया घोडके, सरुबाई चव्हाण या पात्र महिलांनी रमेशआप्पा कराड यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित मतदार संघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खा. भागवत कराड म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून आ रमेशआप्पा कराड यांनी मतदार संघाची मजबूत बांधणी केली असून काँग्रेसच्या घराणेशाही विरुद्ध लढण्यासाठी आप्पांचा विजय महत्त्वाचा आहे यासाठी सर्वांनी अहोरात्र मेहनत घेऊन काम करावे, आपल्या बुथवर विजय हाच रमेशआप्पांचा विजय आहे. आप्पा निवडून आल्यानंतर लातूर ग्रामीण मतदार संघ विकासाची नांदी ठरणार आहे तेव्हा सर्वांनी एक दिलाने बहुमतासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
यावेळी बोलताना आ रमेशआप्पा कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शासनाच्या माध्यमातून केलेल्या विविध विकास कामाची सविस्तर माहिती दिली. कोणत्या ना कोणत्या योजनेचे प्रत्येक कुटुंब लाभार्थी आहेत. या सर्व योजना भविष्यात चालू ठेवण्यासाठी गावा गावातील विकासाला गती देण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणे गरजेचे आहे. लाडक्या बहिणीचा भावाच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात असणार आहे. आज पर्यंत मी केलेल्या कामाची पावती देण्याची हीच वेळ असून प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून मतदाराच्या घराघरात जाऊन मिळालेला योजनेची जाणीव करून द्यावी मी केलेले काम सांगावे असे सांगून काँग्रेस कडून मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जातील यावर विश्वास न ठेवता जिद्दीने काम करावे असे आवाहन केले. एक लहाने गेला तर दुसरे दहा लहाने आले. गेले ते कावळे होते राहिले ते मावळे आहेत असेही त्यांनी बोलून दाखविले.
गेल्या २५-३० वर्षापासून साम दाम वापरून देशमुखशाही टिकून ठेवण्याचे काम झाले फक्त आणि फक्त एकाच घरात सत्ता असली पाहिजे यासाठीच काँग्रेस पुढाऱ्याचे काम असल्याचे सांगून शिवसेना संपर्कप्रमुख बळवंत जाधव म्हणाले की, लोकशाहीची पूर्ण स्थापना करून संकटाला धावून येणारा, विकासाला गती देणारा आणि अडचणीत मदत करणारा निस्वार्थी शेतकरी पुत्र आ रमेशआप्पा कराड यांनाच बहुमताने विजयी करण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांनी जिद्दीने काम करावे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाणे, फकीरा ब्रिगेडचे प्रा. संजय शिंदे, भाजपाचे नवनाथ भोसले, हनुमंतबापू नागटिळक, अनिल भिसे, अभिषेक आकनगिरे, ललिता कांबळे यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून आ. रमेशआप्पा कराड यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले प्रारंभी दशरथ सरवदे यांनी प्रस्तावित केले तर शेवटी भागवत सोट यांनी उपस्थित यांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले.
याप्रसंगी गोविंद नरहारे, चंद्रसेन लोंढे नाना, गोपाळ पाटील, सुकेश भंडारे, महेश गाडे, उत्तरेश्वर हेरकर, राम मोरे, लक्ष्मण यादव, श्याम वाघमारे, पांडुरंग बालवाड, धनराज शिंदे, अंबादास राठोड, श्रीमंत नागरगोजे, फुलचंद अंधारे, श्रीकृष्ण जाधव, काशिनाथ ढगे, अशोक सावंत, बालाजी शिंदे, सोमनाथ आप्पा पावले, श्रीकृष्ण मोटेगावकर, विजय चव्हाण, दत्ता सरवदे, श्रीकृष्ण पवार, महादेव मुळे, विजय गंभीरे, बाबुराव कस्तुरे, शरद दरेकर, उत्तम चव्हाण, विश्वास कावळे, रमा चव्हाण, रशीद पठाण, राजू आलापुरे, जलील शेख, ललिता कांबळे, सुरेखा पुरी, अनुसया फड, लता भोसले, शीला आचार्य, दिलीप पाटील, नरसिंग येलगटे, विठ्ठल कस्पटे, शेख अजीम, विनायक मगर, शरद शिंदे, ज्ञानोबा भिसे, महेश कणसे, बालाजी गवळी, अभिजीत मद्दे, रामकिशन गोरे सुरेश बुड्डे राजेंद्र गिरी, महेश वाघमारे, राम बंडापल्ले, ज्ञानेश्वर जुगल, लक्ष्मण नागिमे, आदिनाथ मुळे, सुरज जाधव, ईश्वर बुलबुले, खंडू सुरवसे, योगीराज साखरे, प्रशांत शिंदे यांच्यासह लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा व मित्र पक्षाचे प्रमुख पदाधिकारी बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.