औसा मतदारसंघातील १२ तांड्याना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळवून देऊ – आ अभिमन्यू पवार

औसा मतदारसंघातील १२ तांड्याना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळवून देऊ – आ अभिमन्यू पवार

तांडा विकासासाठी ७१ हजार कोटींचा विकास आराखडा तयार - आ अभिमन्यू पवार

औसा – स्वतंत्र भारताच्या इतिहासा नंतर कधीही जेवढा विकास निधी उपलब्ध झाला नाही तेवढा निधी या पाच वर्षांत उपलब्ध करून दिला या विकासाला गती देत असताना मतदारसंघातील तांडे, वस्ती व वाडी यांना विकासाशी जोडण्याचे काम प्राधान्याने केले आहे. मतदारसंघातील २७ तांड्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून यापैकी १२ तांड्याना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा येणाऱ्या काळात दिला जाणार आहे. एकंदरीत महायुतीच्या सरकारने लातूर जिल्ह्यातील तांडा विकासासाठी ७१ कोटींचा विकास आराखडा तयार केला असून येणाऱ्या काळात लातूर शहरात वसंतराव नाईक यांचा पुतळा उभारला जाणार असल्याची ग्वाही आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते औसा तांडा, खानापूर तांडा व बोरफळ तांडा येथे बोलत होते. याप्रसंगी डॉ गणपत राठोड, सचिन चव्हाण, महेश चव्हाण, विठ्ठल चव्हाण, सुभाष राठोड, बजरंग जमादार, चंदर राठोड,संभाजी सुरवसे, प्रकाश भार, किरण चव्हाण, संजय राठोड, नेताजी चव्हाण, वामन जाधव, अरुण चव्हाण, शरद राठोड आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आ अभिमन्यू पवार बोलत होते की समाजाच्या समस्या व अडचणी मला माहित आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या भूमिकेतून मी विधीमंडळात जनतेचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. आणि या पाच वर्षांत विकास काय असतो हे मी दाखवून दिले आहे. प्रत्येक तांड्यावर रस्ते, नाली, पाणीपुरवठा योजनेसाठी रोहित्री आदी कामासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर अधिक भर देण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून या समाजाची मागणी होती कि लातूर येथे वसंतराव नाईक यांचा पुतळा उभारला जावा म्हणून याबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा करून विधीमंडळात मागणी केली त्या अनुषंगाने लातूर शहरात वसंतराव नाईक यांचा पुतळा उभारणीसाठी जागा निश्चित करून घेण्यात आली असून लवकरच त्याठिकाणी पुतळा उभारला जाणार आहे.समाजाचा सन्मान म्हणून या सरकारने पोहरादेवी चे महंत बाबुसिंग महाराज यांना आमदार केले असून त्यांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्याचे काम केले जाणार असल्याचे सांगून महायुतीच्या सरकारने मातृत्वाचा सन्मान केला आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक आधार असल्याचे त्यांनी सांगितले..

• तांडा विकासाला गती देण्यासाठी आ अभिमन्यू पवारांना साथ द्या – डॉ गणपत राठोड

यावेळी बोलताना डॉ गणपत राठोड म्हणाले की आतापर्यंत तांडा विकासाकडे कोणत्या आमदारांने फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे तांडा विकासाचा अनुशेष मोठा होता. मात्र या पाच वर्षांत आ अभिमन्यू पवार यांनी प्रत्येक तांडा विकासाला जोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे तांडे विकासाकडे जाताना दिसत आहेत. तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून प्रत्येकाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे काम कौतुकास्पद असून तांडा विकासाला गती देण्यासाठी आ अभिमन्यू पवारांना साथ देण्याचे आवाहन डॉ गणपत राठोड यांनी केले.

editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *