लातूर : दिनांक 26 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 2024 दरम्यान राज्यस्तरीय योगासन स्पर्धा श्री श्री रविशंकर विद्यालय लातूर या शाळेत आयोजित करण्यात आली. या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता पतंजली योग समितीचे तालुकाध्यक्ष श्री नेताजी सावंत सर यांनी महत्त्वाचे भूमिका बजावल्यामुळे तसेच योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यामुळे शिक्षण उपसंचालक डॉ. मा.गणपतरावजी मोरे साहेब यांनी श्री नेताजी सावंत सरांचा शाल, श्रीफळ व तुळशीचे रोप देऊन सन्मानित केले.
या प्रसंगी राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत अनुराग सावंत सह जवळपास 500 विद्यार्थांनी सहभाग घेतला असून , महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंच मंडळी उपस्थित होती. राष्ट्रीय स्तरावर योगासन स्पर्धेकरीता निवड झालेल्या स्पर्धाकांचा मेडल देऊन गौरविण्यात आले. या सत्कार समारंभ प्रसंगी , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील जिल्हा क्रीडाअधिकारी मा. जगन्नाथजी लकडे साहेब , मा.लटके साहेब , मा. कृष्णा केंद्रे साहेब ,सुरेंद्रजी कराड ,धीरज बावणे साहेब , स्वप्नील साहेब , श्री श्री रविशंकर शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष आशिष कोळगे , योगा असोशियशनचे अध्यक्ष मा. विष्णुजी भूतडा ,सचिव तथा जेष्ठ विधिज्ञ मा . ॲड.महादेवजी झुंजे पाटील , सहसचिव रामलिंगजी बिडवे साहेब , जिल्हाध्यक्ष रामजी घाडगे , श्री हनुमान विद्यालय शिवलीचे माजी मुख्याध्यापक मा.श्री संदीपानजी माळी सर ,पतंजली योग समितीचे पदाधिकारी , तसेच योगा असोशियशनचे पदाधिकारी ,रुद्रा स्पोर्टसच्या संचालिका , तथा अंतरराष्ट्रीय प्रशिक्षीका आशाजी झुंजे पाटील ,योगेश सर , सागर सर , महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले पंच मंडळी , पालकगण , प्रेक्षकगण व योगप्रेमी अबालवृद्ध स्त्री – पुरुष उपस्थित होते.