लातूर : लातूर विधानसभा मतदार संघाचे वंचित बहूजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विनोद खटके यांच्या प्रचारार्थ महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांची 10 नोव्हेंबर रोजी लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर सकाळी 11 वाजता विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी वंचितचे स्टार प्रचारक ॲड. सर्वजीत बनसोडे, तय्यब जफर यांच्यासह अनेक वरिष्ठ मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या सभेला लातूरकरांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी लातूरच्या वतीने करण्यात आले आहे.
ॲड प्रकाश आंबेडकर यांची विराट सभा लातूरमधील ऐतिहासिक सत्ता परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर नुकतीच एंजिओप्लास्टिची शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. तरी देखील मराठवाड्यात त्यांच्या सहा सभा होणार आहेत. लातूर येथील विराट सभा सकाळी 11 वाजता वेळेवर सुरु होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी 10 वाजताच उपस्थित राहावे,
असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके यांनी केले आहे. या विराट सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी,लातूर जिल्हा प्रभारी रमेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष सलीम भाई सय्यद, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषाताई निंबाळकर, जिल्हा महासचिव ॲड. रोहित सोमवंशी, जिल्हा संघटक सचिन लामतुरे,
शहराध्यक्ष सचिन गायकवाड, शहर महासचिव आकाश इंगळे, महिला शहराध्यक्ष सुजाताई अजनीकर, युवा शहराध्यक्ष महेंद्र बनसोडे, युवा जिल्हाध्यक्ष युवराज जोगी, जिल्हा महासचिव नितीन गायकवाड यांच्यासह संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.