औसा : औसा विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार लोकनेते दिनकरराव माने साहेब यांच्या प्रचारार्थ धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सौभाग्यवती संयोगिता ओमराजे निंबाळकर यांनी औसा मतदार संघ अक्षरशः पिंजून काढताना पाहण्याचे भाग्य लाभत आहे. लोकसभेला मा.आ. दिनकरराव माने साहेब यांची प्रकृती ठिक नसतानाही गावो गावी प्रचार करून खासदार ओमराजे निंबाळकर यांना भरघोस म्हणजेच जवळपास ३४ हजार मतांची आघाडी मिळवून दिलेली आहे. याच सहकार्याची भावना मनामध्ये साठवून खुद्द ओमराजे निंबाळकर औसा मतदार संघा मधील हालचालींवरती बारीक लक्ष ठेवून दिवसें दिवस मतदारांचे व मताधिक्याचे पारडे जड करण्याकडे कल देत आहेत. एवढ्या वरतीच न थांबता दस्त खुद्द त्यांच्या सौभाग्यवती सौ. संयोगिता ओमराजे निंबाळकर या ही पायाला भिंगरी लावून औसा मतदार संघामध्ये दिवसभर घरोघरी प्रचार करून अक्षरशः गाव , वाडी व वस्ती पिंजून काढून मशाल चिन्हांचा प्रचार व प्रसार घरोघरी करत आहेत.
महाविकास आघाडीचे घटक पक्षातील काँग्रेसचे जेष्ठ महिला नेते , राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) पक्षाचे महिला नेते , शिवसैनिक व इतर समविचारी व सहकारी पक्षांतील महिला यांनी मतदार संघा मधील दारोदार प्रचार यंत्रणा सक्षमपणे राबवून प्रत्येक मतदारा पर्यंत पोहण्याचे कसब सहजपणे पार पाडलेले आढळून येत आहे.
मतदारांना भेटून , अडीअडचणी जाणून , मशाल चिन्हांचे प्रबोधन करत असताना , जनताच मैदानामध्ये स्वतः उमेदवार समजून काम करत असल्याचे चित्रण बघण्यास लाभत आहे. त्यामुळे सौ. संयोगिता ओमराजे निंबाळकर यांचा उत्साह द्विगुणित होवून प्रचाराला गती तर लाभलेली आहे व त्याचे रूपांतर मताधिक्याचे या प्रगतीमध्यै वाढ होण्याचे संकेत खुणावताना जाणवत आहेत.
सौ. संयोगिता ओमराजे निंबाळकर या घरोघरी जावून मतदारांना जागरूक करणे , गल्लो गल्ली सभा घेणे , पक्षाचे ध्येय धोरण सांगणे या वरती भरीव व उल्लेखनीय कामगिरी करताना पोटतिडकीने बोलून , समजावून सांगत असल्याचे खरे रूप वारंवार आढळून येत आहे. विशेष म्हणजे मतदार राज्यांना या गोष्टी मनस्वी आवडलेल्या असून , लोकसभेमध्ये पाठविलेल्या बलराम रूपी ओम दादांना औसा तालुक्यातील कृष्ण रूपाने श्रीमान दिनकरराव माने साहेबांना विधानसभे मध्ये पाठविण्याचा चंगच बांधला गेला आहे. चालू असलेल्या भंपक सरकारला पाय उतार करण्यास भाग पाडणार अशी भावना जनते मधून चौका चौकात बोलले जात आहे.
सौ. संयोगिता ओमराजे निंबाळकर यांनी प्रचारार्थ घेतलेला पुढाकार , दिवसेंदिवस महिलांची लाभत असलेली साथ व गावोगाव मिळत असलेला एकनिष्ठ तेचा प्रतिसाद हा विरोधकांना धडकी भरवणारा ठरत आहे.
प्रचारा दरम्यान माने साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात बांधलेले मंदीर , समाज मंदिर, केलेले रस्ते , पाण्याची सुविधा , विजेचे नियोजन यांचा उल्लेख आजही मतदार आवार्जून करत आहे.विरोधी पक्षांमधील नेते व कार्यकर्ते त्याच मंदीरामध्ये बैठका घेत आहेत हे ही नवलच. विशेष म्हणजे याच गोष्टी मतदार राजा प्रचारार्थींना सांगत आहेत.
दिनकरराव माने साहेबांनी सुक्ष्मपणे केलेले नियोजन , हाताळण्याचे कसब व लाभत असलेला उदंड प्रतिसाद पाहून मशाल विजयी होणार असेच चित्रण सध्या तरी औसा शहर व परिसरामध्ये पाहण्यात येत आहे.
विशेषतः सर्वसामान्य शेतकरी वर्ग , सुक्षित बेकार वर्ग व महिलांचा उदंड प्रतिसाद गावोगावी लाभत असून , यांचा परिणाम मताधिक्यामध्ये झालेले पाहणे बाकी तेवढे राहिले आहे.
एकंदरीत निरंतर प्रचाराचा ओघ पाहता औसा मतदार संघामधून मशालीच्या चिन्हावर उभे असलेले लोकनेते दिनकरराव माने साहेब बहुमताने विजयी झाले हेच ऐकणे बाकी राहिले आहे , अश्या भावना गावा गावामधील ग्रामस्थ बोलताना ऐकण्यास लाभत आहे.