लातूर : काँग्रेस पक्ष नेहमीच गोरगरिबांची बाजू घेत आला आहे.पक्षाचे संपूर्ण राजकारण गोरगरिबांसाठीच आहे,असे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे आ.धीरज देशमुख यांनी केले.काँग्रेसचा जाहीरनामा घराघरात पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महाविकास आघाडीचे लातूर ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार आ.धीरज देशमुख यांनी रविवारी गातेगाव,एकुर्गा व ढाकणी येथे ग्रामस्थांशी संवाद साधला.त्यांच्याशी चर्चाही केली.
नागरिकांशी बोलताना आ.देशमुख म्हणाले की गरीब जनतेच्या न्यायासाठी आम्ही आजपर्यंत राजकारण केले आणि यापुढेही ते करत राहणार आहोत.काँग्रेसने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक या माध्यमातून केली. मात्र महायुती सरकारने भुलथापा देत शेतकऱ्यांना केवळ खोटी आश्वासने दिली.त्यांच्याकडून कोपराला गुळ लावण्याचे काम केले जात आहे.चहा विकणारे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि आता त्यांनी देशच विक्रीला काढल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.हे सरकार गोरगरिबांकडून जीएसटी स्वीकारते आणि श्रीमंतांची कर्जमाफी करते.त्यामुळे या निवडणुकीत महायुतीच्या सरकारला हद्दपार करा,असे आवाहन आ.देशमुख यांनी केले.
आ.देशमुख यांनी सांगितले की,शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी,युवकांना रोजगार आणि महिलांना अधिक निधी मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार येणे गरजेचे आहे.त्यासाठी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा मतदारसंघातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात पोहोचवा,असे आवाहनही त्यांनी केले.
आ.देशमुख यांच्या या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमास गातेगाव येथे रविंद्र काळे,गोविंद बोराडे,मांजरा कारखान्याचे संचालक कैलास पाटील,अनुप शेळके,वीरसेन भोसले,समीरसिंह देशमुख,शिवसेना ( उबाठा ) तालुकाप्रमुख कैलास पाटील,शंकर देशमुख,महादेव काळे,पांडुरंग माळी,पांडुरंग पाटील,बालाजी खोसे,दशरथ बनसोडे,प्रविण सोनकांबळे, संजय सरवदे,रामेश्वर माळी,बाळासाहेब बनसोडे, सत्तारभाई बागवान,संजीवन गुरुजी पोतदार आदींची उपस्थिती होती.
एकुर्गा येथे गुरुनाथ गवळी , सुधाकर गवळी ,दिनकर इंगळे ,श्रीनिवास शेळके , अंगद वाघमारे,माळीताई,नारायण पाटील,ओम घुटे,विष्णू पटाडे,समाधान घुटे,पप्पू कोरके तर ढाकणी येथे राजेसाहेब सवई,शरद जाधव,किशोर सुडके,नागराज जाधव,राजाभाऊ जाधव,श्रीराम काळे,अनिल जाधव,राघु सुरवसे,विलास जाधव,नवनाथ काळे,मेघराज जाधव,समाधान सरजे आदींसह ग्रामस्थ व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.