औसेकरांच्या माने वरील लूटारू उतरवण्यासाठी दिनकरराव माने यांना उमेदवारी – उद्धव ठाकरे कडाडले

औसेकरांच्या माने वरील लूटारू उतरवण्यासाठी दिनकरराव माने यांना उमेदवारी – उद्धव ठाकरे कडाडले

• उद्धव साहेबांच्या दणदणीत विचाराने महाविकास आघाडीचे नाणे खणखणीत. • तब्बल ७०० भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा उबाठा मध्ये पक्ष प्रवेश

कासार शिरसी : कासार शिरसी( ता. निलंगा ) औसा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमान दिनकरराव माने साहेब यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पहिली जाहीर सभा अलोट गर्दीने संपन्न झाली. उबाठा गटाचे पक्षप्रमख व महाविकास आघाडीचे घटक श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी औसा व निलंगा परिसरातील मतदार राजा हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिल्याचे पाहून , तुम्ही दिनकररावांना आजच विजयी घोषित केल्याचे सांगून , लवकरच दिनकररावांना मुंबईला पाठवा , त्यांची पुढची काळजी मी घेतो अशी ग्वाही दस्त खुद्द पक्ष प्रमुख ठाकरे यांनी भर सभेमध्ये दिली.
सकाळी १० वाजता सभेचे नियोजन असताना तब्बल ५ तासानंतर म्हणजेच दुपारी ३ वाजता उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. तरीही उपस्थित जनता तसूभरही हलली नाही. मतदारांची अलोट गर्दी , उदंड प्रतिसाद पाहता विरोधकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
पक्ष प्रमुख उद्धव साहेबांनी आपल्या भाषणा द्वारे विद्यमान आमदार व केंद्र सरकार यांचा खरपूस समाचार घेतला. फोडणी तडकलीय आणि आता लाडकी बहीण भडकली आहे अशी सुरुवात करून बेछूट पणे महागाई वाढवणारे हे महा युती सरकार नसून हे महाग युती सरकार आहे व या सरकारला महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून हद्दपार करणे हेच सर्वसामान्य जनतेचे हित आहे असे ठणकावले.
शेतीप्रधान शेतकऱ्यांसाठी डोक्याचा वापर करून हितकारक निर्णय घेणारे सरकार नसून , उद्योगपती व भ्रष्टाचारी नेत्यांच्या स्वार्था पोटी काम करणारे बोके रूपी खोके सरकार आहे. सोबतच हे उठता बसता उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे जप करणारे भाकड व भेकड पक्ष आहे असे म्हणाले.
मतदारांचा उदंड प्रतिसाद पाहून महाविकास आघाडीचे सरकार लवकरच स्थापन होईल व पंचसुत्री लागू करून जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार हे ही आश्वासित केले. सोबतच , मुली बरोबरच मुलांनाही मोफत शिक्षणाची सोय करणार , सोयाबीन व कापूस यांना योग्य हमीभाव ठरवून शेतकऱ्यांना न्याय देणार , अतिवृष्टी , दुष्काळ निवारण यंत्रणा गतीशिलतेने अवलंबून शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले.
माझी येताना व जाताना २ वेळा बॅग तपासणी केली तशीच मोदी व शहा यांची पण महाराष्ट्रातून जाताना बॅग तपासा कारण हेच लोक महाराष्ट्र लुटून गुजरातला भरती करत आहेत व पसार होत आहेत हे ही सांगायला विसरले नाहीत.
शेतकरी हिताय सरकार कटकारस्थान रचून रात्रीतून पाडण्यात आले. अशा मिंदे सरकारला कायमचाच रस्ता दाखविण्याची ही संधी सोडू नका व या संधीची सुरुवात औसा तालुक्या मधून झालेली आहे.
मोदींचे १५ लाख सर्वसामान्य लोकांना मिळाले नाहीत, तुम्हाला मिळाले का..? विचारताच नाही हा सुरू मिळाला… पण विद्यमान आमदाराला मात्र भरभरून मिळवून दिले.मतदार संघापासून ते मुंबई मंत्रालया पर्यंत फक्त दलालांचा सुळसुळाट करण्याचे काम विद्यमान आमदाराने केले आहे. बास्स हेच काम या आमदाराचे केले आहे.
तदपुर्वी विविध मान्यवर नेत्यांची खणखणीत भाषणाने सभेला चांगलीच रंगत वाढवलेली होती. श्रीमान अमित देशमुख यांनी महायुतीचे सरकार स्थापन होताच १५ डिसेंबर २०२४ पर्यंत ३ लाख रूपया पर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफी करणार अशी ग्वाही दिली.सोबतच , नियमीत कर्ज फेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर रूपये ५०००० रूपये अनुदान देणार असल्याचे घोषित केले.
महा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमान दिनकरराव माने यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यमान आमदार यांनी ५ वर्षात कमावली देशभर भरमसाठ संपत्ती यांची कागदोपत्री पोलखोल केली. औसा, लातूर , पुणे सह जम्मू काश्मिर पर्यंत संपत्तीचे पुरावे जनते समोर मांडून विद्यमान आमदारांची कुंडलीच उघडली. सत्तेमध्ये समाविष्ट होवून जनतेच्या हिताचे जास्तीत जास्त कामे करणार असे अश्वासित करून , जनतेचा पैसा गोळा करून मलिदा खाणारा पहिला आमदार आहे , असे ठणकावून सांगितले.हा जनतेचा आमदार नसून फडणवीसांचा मोजणी दार आहे हे रोखठोकपणे बोलले.
सद्य स्थिती पाहता दिनकरराव माने साहेब यांना मतदार राजाने विजयी घोषित करून फक्त औपचारिकतेने विजय घोषित करणे बाकी राहिलेले आहे व किती मताधिक्याने निवडून येतील याचीच चर्चा गावा गावातील चौका चौकात ऐकण्यास येत आहे.

editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *