औसा: औसा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमान दिनकरराव माने साहेब यांच्या प्रचारार्थ उबाठा गटाचे सन्माननीय पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा मंगळवार दिनांक १२ रोजी मौजे कासार शिरसी ( ता. निलंगा ) येथे सकाळी ठिक १० वाजता आयोजीत करण्यात आलेली आहे.
कोणत्याही भूलथापांना बळी न पडता , मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे व शेवट पर्यंत बाळासाहेबांचाच शिवसैनिकच राहणार या तत्वाला अनुसरून वाटचाल करत असलेले एकनिष्ठ व पक्षनिष्ठा ठरलेले उमेदवार दिनकरराव माने साहेब यांना निवडून आणण्यासाठी दस्त खुद्द खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली बाजी पणाली लावलेली दिसून येत आहे. याच अनुषंगाने मंगळवार दिनांक १२ मंगळवार रोजी मौजे कासार शिरसी ( ता. निलंगा ) येथे सकाळी १० वाजता उबाठा – शिवसेना प्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची जाहीर सभा घेण्यात येत आहे.
श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निलंगा तालुक्यातील ही पहिलीच सभा असल्यामुळे महाविकास आघाडीतील नेते , घटक पक्ष , कार्यकर्ते व मतदार राजा यांच्यामध्ये कमालीचे आनंदी वातावरण संपूर्ण मतदार संघामध्ये निर्माण झालेले आहे.
याच माध्यमातून श्रीमान उद्धव ठाकरे हे शिवसैनिक व महायुतीच्या कार्यकर्तांना काय संबोधित करतात..? कोणते आदेश देतात..? व काय अपेक्षित असलेले ईप्सित साध्य करण्यासाठी कसे मार्गदर्शन करतात..? याकडे सबंध औसा मतदार संघातील महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहीले आहे.
सद्य स्थितीत खासदार ओमराजे निंबाळकर व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमान दिनकरराव माने साहेब यांना मानणारा लहान , थोर व वयस्क वर्ग फारच मोठ्या प्रमाणात आहे. माने साहेबांनी १० वर्षाच्या कार्तकाळा मध्ये केलेल्या कामाचा बोलबाला आजही दस्तखुद्द मतदार राजा सांगताना पाहण्याचे चित्रण गावो गावी दिसत आहे. भविष्यातील बांधावरचा नेता , सर्वसामान्य जनतेचा नेता व सर्वसामान्यांच्या अडी अडचणी ओळखून कार्य केलेला नेता ही कमावलेली प्रतिष्ठा रूपी बिरूदावली आजही मतदार राजा विसरलेला नाही. याच कार्याच्या , माणुसकीच्या व कमावलेल्या विश्वासाच्या जोरावरती सद्य निवडणूक ही माने साहेबांना एकतर्फी होणार असेच चित्रण सद्य स्थितीला दिसून येत आहे.
सोबतच गेल्या किन्ही महिन्यांपासून गावो गावी दिलेल्या भेटी , जाणून घेतलेल्या अंडी अडचणी व आश्वासित केलेल्या शब्दांमुळे कार्यकर्ते व गावकरी जोमाने माने साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. सोबतच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज रोजी पर्यंत मतदार राजाला दिलेली तात्काळ सेवेमुळे सर्वसामान्य जनता ही महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतित होत आहे.
लोकसभेला दिलेल्या ३४ ते ३५ हजार मताधिक्यापेक्षा वाढीव मताधिक्य देवून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमान दिनकरराव माने साहेबांना घवघवीत यशाने विजयी करू असा विश्वास शेतकरी , कष्टकरी व रोजगारी वर्ग बेंबीच्या देठापासून बोलून दाखवत आहे. नेत्या प्रती असलेली भावना व नेते माने साहेब यांचे कार्यकर्त्यां प्रती असलेले जिव्हाळ्याचे ॠणानुबंध पाहता सध्या तरी महाविकास आघाडीचे पारडे फारच जड दिसून येत आहे.
त्यात उद्धव ठाकरे साहेबांच्या सभे नंतर मताधिक्या मध्ये नक्कीच भरीव वाढ होवून घवघवीत विजयश्री खेचण्याचा मानस उबाठा गटाकडे नक्कीच असणार हे मात्र नक्की.
महाविकास आघाडीचे नेते , पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून विचार ऐकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.