लातूर : मॅनेज म्हणल्यास अब्रुनुकसानीचा दावा लावणार असल्याचे सचिन रामराजे देशमुख यांनी शाही भोज हॉटेल लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली.
मुळचा रा. सारोळा, ता. लातूर येथील रहिवासी असून
मी २०१९ विधानसभेत लातूर ग्रामीण मध्ये शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडणुक लढवली. शिवसेनेचे प्रमुख माननीय उध्दवजी यांनी मला उमेदवारी देताना काँग्रेसचा उमेदवार ठरलाही नव्हता. हे मी सर्वांना निदर्शनास आणु इच्छितो.
पूर्वी मी भारतीय जनता पार्टीचा उद्योग आघाडीचा राज्याचा प्रमुख या नात्याने कार्यरत होतो. लातूर हे माझे कार्यक्षेत्र नव्हते. तर उद्योग क्षेत्रात राज्य कार्यक्षेत्र समोर ठेऊन मी कार्य करत होतो व त्या काळात माझा निवास मुंबईमध्ये ठाणे व मराठवाड्यात संभाजी नगर येथे होता. तत्पूर्वी माझा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता. उद्योजक हीच माझी सुरुवातीपासूनची ओळख आहे. माझा भाजपामध्ये प्रवेश सुधीर मुनगंटीवारजी अध्यक्ष असताना भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे झाला. मी मा. नितीनजी गडकरी साहेब यांच्या नेतृत्वात स्वतः ते राष्ट्रीय अध्यक्ष असताना प्रथम नागपूर येथे प्रवेश करुन भाजपासाठी कार्य सुरु केले. माझे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य होते, त्यामुळे लातूर परिसरात मी भाजपा कार्यकर्ता म्हणून फारसा परिचित नव्हतो.
लातूर येथे भाजपाचे राज्य निवडणुक प्रभारी आले असताना मी भाजपाची ग्रामीणची उमेदवारी मागितली होती. हे आपणास सांगू इच्छितो. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात माझे सारोळा हे गाव येते. हे गाव बाभळगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये येते. या ठिकाणी जिल्हा परिषद बाभळगाव मतदार संघात माझ्या लहान भावाची पत्नी सौ. गौरी देशमुख या भाजपाकडून निवडणुकीस उभ्या राहिल्या होत्या हे की आपणास सांगू इच्छितो. मा. श्री. रामेदवजी बाबा व माझे वैयक्तिक संबंध असल्यामुळे लातूर ग्रामीण विधानसभेच्या निवडणुकीत पूज्यनीय बाबा रामदेव यांनी माझी शिफारस केली होती. त्याचवेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाण्याचे वाटत होते. शेवटी राज्याच्या भाजपा शिवसेना महायुतीच्या नेत्यांच्या समन्वय बैठकीत मतदार संघाच्या वाटणीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघ शिवसेना या पक्षाकडे जाण्याचे ठरले. जिल्ह्यातील एक तरी विधानसभा शिवसेना लढणार आणि ती लातूर ग्रामीण मतदार संघ असे ठरल्यानंतर मला सहकार्य करणारे पूज्यनीय रामेदव बाबा यांनीच उध्दवजींना बोलून मला उमेदवार करण्यास प्रवृत्त केले. मी भाजपातून शिवसेनेत प्रवेश केला व तिकीट घेतले हे भाजपा पक्षादेशानुसारच होते व राज्य शिर्ष नेतृत्वाकडून यास मान्यता होती. मी उमेदवारी घेतल्यानंतर नवीन पक्ष व तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते यांची संपूर्ण ओळख नाही अशा परिस्थितीत उमेदवार म्हणून लातूर येथे आलो. सर्वजन युती धर्माचे पालन करतील आणि मी मूळचा भाजपाचा असल्याने मला शिवसेनेपेक्षाही कार्यकर्ते व नेत्यांची जास्त मदत होईल ही अपेक्षा होती. शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष असल्यामुळे शिवसेनाप्रमुख व जिल्हा प्रमुख यांना भेटले की पक्ष कामाला लागतो हीच माझी भावना होती. उमेदवारी घेऊन लातूरला आल्यानंतर भाजपाचे इच्छुक उमेदवार यांच्याकडून मला कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. इतकेच काय पक्षाचा आदेश व युती धर्म म्हणुनही कोणीच फॉर्म भरण्यास उपलब्ध नव्हते. ना इच्छुक उमेदवार, ना पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. त्याच वेळी ज्या पक्षाने उमेदवारी दिली त्या शिवसेनेचे पक्ष प्रमुख, तालुकाप्रमुख, पदाधिकारीही उपस्थित नव्हते. विष्णु साठे, पप्पू कुलकर्णी उपस्थित होते. ॲड राहुल मातोळकर युवा सेना अध्यक्ष उपस्थित होते. सामान्य कार्यकर्ते मात्र उत्साहाने आले होते. त्यांचाही भाजप सेना पदाधिकाऱ्याच्या या वागण्यामुळे उत्साह संपला. तेही पुन्हा प्रचारासाठी आले नाहीत. राज्यातील व जिल्ह्यातील कोणत्याही भाजप सेना नेत्यांनी मला मदत करण्यासाठी पुढाकार घेऊन ग्रामीण मध्ये काम केले नाही. त्याच दरम्यान लातूर ग्रामीण विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मधून काँग्रेस पक्षाची उमेदवारी धिरज देशमुख यांना मिळाली. भाजपाच्या इच्छुक उमेदवारांनी व तिकीट न मिळालेल्या एका उमेदवाराने माझ्याबद्दल मॅनेज उमेदवार म्हणून जाहीर प्रतिक्रीया देऊन लातूर ग्रामीणचा अख्खा भाजप नोटांच्या प्रचारासाठी राबवला व नोटा जणू हाच भाजपाचा उमेदवार आहे असा प्रचार व प्रसार करोडो रुपये खर्च करुन केला आणि ३२ हजार मते नोटाकडे वळवली.
शिवसेनेच्या सामान्य कार्यकत्यांनाही त्यांनी सोबत घेतले व त्यांनाही माझ्या प्रचारापासून वंचित ठेवले. त्यामुळे मी संपूर्णपणे नागवला गेलो. भाजपा सेना महायुतीचा उमेदवार म्हणून कसलीही प्रतिष्ठा न ठेवता दोन्ही पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी चक्क निवडणुकीकडे पाठ फिरवली व मला वाऱ्यावर सोडले अशा वेळी दोन्ही पक्षाकडून माझा भ्रमनिरास झाला आणि मी त्या काळात संपूर्ण हताश झालो. त्यामुळे माझाही उत्साह कमी झाला. परंतु हतोत्साह न होता मतदार संघातील १९७ गावांपैकी ७९ गावे पहिल्या सहा दिवसात पिंजून काढली. प्रत्येक ठिकाणी सामान्य जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद असतानाही भाजपाच्या प्रमुख व इच्छुक उमेदवाराचे कार्यकर्ते सतत प्रश्न विचारुन, फोन करुन अडचणीत आणून मला अडथळे निर्माण करत होते. या लोकांनी संपूर्ण निवडणुक होवोस्तर अडचणी आणण्यात कुठलेही कसर सोडली नाही. त्यामुळे मी पुढे प्रचार संथपणे केला व परिस्थिती बदलेल अशी आशा ठेवली.
त्याचवेळी वरिष्ठ नेत्यांकडे मी वेळोवेळी पाठपुरावा करुन मतदार संघाची परिस्थिती सांगुन ती बदलण्यासाठी मुंबई वारी करुन आलो. ऐन निवडणुकीत मी तीन दिवस मुंबईत सेना नेत्यांना भेटुन परिस्थितीला बदलण्यासाठी मी पाठपुरावा करत राहिलो. यात शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते व नार्वेकरांनाही कल्पना देऊन शिवसेनेच्या स्थानिक लोकांना कार्य करण्यास प्रवृत्त करणे व भाजपाच्या प्रमुख नेत्यांना सांगून व विरोध बंद करुन सहकार्य करावे असे सुचविण्यास आग्रह केला. ऐन निवडणुकीत तीन दिवस मुंबईत राहिल्याने पून्हा मॅनेज, मॅनेज अशी चर्चा वाढली. त्याच काळात मला शिवसेनेच्या अशा अनेक जणांनी गैरसमजातून धमकीवजा फोन केले. मिनिटाला चार पाच कॉल होते. त्यामुळे मी घाबरुन गेलो पुढील काळात प्रचारात काही लोकांनी गोंधळही घातला. प्रश्न विचारुन भांडावुन सोडले. तरीही मी प्रचार शेवटपर्यंत थांबवला नाही. मात्र सर्वजण आपापल्या कार्यात, घाईत मग्न असल्याने मला फारसे यश आले नाही. तरीही १३५०० मते मला फारसा प्रयत्न न करता मिळाली. हे माझे निव्वळ वैयक्तिक प्रतिष्ठेची मते होती आणि ती शिवसेनाच्या आत्तापर्यंतच्या मतापेक्षा जास्त होती.
मॅनेज उमेदवार अशी प्रतिमा करणाऱ्या भाजपाच्या इच्छुक उमेदवारास विरोध करुनही पार्टीने आमदारकी बहाल केली. शिवसेनेने ही मला उमेदवारी देऊन चक्क माझा बळी घेतला. दोन्ही पक्षांकडून माझी अडचण केली होती आणि सामान्य जनतेत मी मॅनेज उमेदवार अशी प्रतिमा केली गेली. माझी ईश्वरावर श्रध्दा आहे. जे जे
घडले त्याचे परिणाम त्या त्या संबंधितास आज ना उद्या भोगावे व फेडावे लागतील. मात्र आपल्या माध्यमातून मी लातूर व परिसरातील सर्व नागरीकांसाठी खुलासा करुन वस्तुस्थिती दर्शक निवेदन आपल्या समोर मांडत आहे.
स्वानुभावातून माझ्या सारख्या एका उद्योजकाला राजकारणाचा बळी कसा असतो हे उमगले. आज माझ्या माध्यमातून तो बळी आज तुमच्या समोर आहे.
आज हे निवेदन करताना आपणास निश्चितपणे एक प्रश्न पडणार आहे तो म्हणजे खुलासा करण्यात मी इतका विलंब का करीत आहे? त्याचे उत्तर खालील प्रमाणे आहे.
कोरोना सदृष्य आजार त्या काळात दोन ते अडीच वर्ष राजकीय विषय इतका महत्वाचा वाटला नाही. कोरोना नंतरच्या काळातही दुसरी लहर पुन्हा वाढली. नंतरही मी फारसा राजकीय दृष्ट्या क्रियाशील नव्हतो. मात्र मनात सतत एक खंत व बोच होती की, कारण नसताना माझ्यावर बदनामी सदृश्य आरोप करुन माझी प्रतिमा मलीन केली गेली. त्यामुळे मी आज रोजी हा खुलासा करीत आहे.
आजही मी भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्र राज्य कार्यकारणीवर विशेष निमंत्रीत सदस्य आहे व भाजपाचे राज्य पातळीवर कार्य करीत आहे. दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडीत आहे. असे काल झालेल्या पत्रकार परिषदेत सचिनराजे देशमुख यांनी माहिती दिली.
