मुंबई : अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणेबाबत मुख्यमंत्र्यांना ०७ आक्टोबर रोजी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या निवेदनात महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये अधिस्विकृती धारकांचे पास चालावेत, राज्यातील सर्व महानगरपालिकेच्या बसेसमध्येही अधिस्विकृती पत्रकारांचे पास चालावेत, दैनिक- साप्ताहिक शासन मान्य यादींवर येण्यासाठी नियमितपणे पडताळणी व्हावी व अटी शिथिल कराव्यात, अधिस्विकृतीधारक पत्रकारांसोबत एका व्यक्तिस मोफत प्रवास करता यावा, शासनमान्य यादीवर नसलेल्या दैनिक साप्ताहिकांच्या प्रासंगिक जाहिराती पूर्ववत करण्यात याव्यात, आमदार निवासमध्ये महाराष्ट्रातील अधिस्विकृतीधारक पत्रकारांना रूम आरक्षित करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. या निवेदनावर औसा तालुका अध्यक्ष वामन विश्वनाथ अंकुश, औसा तालुका सचिव किशोर उत्तम जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
