आमदारांच्या जबाबदाऱ्या काय ? आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा काय ?

आमदारांच्या जबाबदाऱ्या काय ? आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा काय ?

लोक हिताचे कायदे बनविणे ही आमदाराची प्रमुख जबाबदारी आहे.

आमदारांच्या जबाबदाऱ्या काय ❓आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा काय ❓
काही पक्ष कार्यकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आमदार यांनी क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनाला जाणे त्यांना पैसे देणे, आपल्या विभागातील प्रमुख तालुका अध्यक्ष / सरपंच इत्यादीच्या वाढ दिवस साजरे करणे, लग्न समारंभा मध्ये उपस्थित राहणे, सार्वजनिक पूजेला हजर राहून देवभक्त असल्याचे दाखवणे. किंवा इफ्तार पार्ट्या आयोजित करणे किंवा हजर राहणे, बेकार तरुणांना रोजगार देण्याऐवजी पालख्या घेऊन जाण्यास प्रोत्साहन देणे, गणपती, शिवजयंतीला मंडळांना 20/25000 ची मदत करणे, 10 वी किंवा 12 वी पास झालेल्या मुलांचे सत्कार करणे
अशा नको त्या बाबी कार्यकर्ते आमदाराकडून अपेक्षित असतात.

• गावातील समस्या घेऊन जाणारे सरपंच / सदस्य यांच्या द्वारे त्यामध्ये, पाखड्या बांधणे , विहिरी बांधणे, देवळाला देणगी घेणे, सभा मंडप बांधणे, रस्ते बांधून घेणे, स्मशान शेड मारून घेणे, पाणपोई बसवने, गावाच्या प्रवेश द्वारा जवळ कमानी बसवणे, देऊळ / दर्गा यांच्या रस्ता इत्यादी कामा साठी देणगी घेणे अश्या इतर काही कामाच्या साठी निधी मिळवणे.

• परंतु लोक हिताचे कायदे बनविणे ही आमदाराची प्रमुख जबाबदारी आहे.

• यापैकी काही गोष्टी पोलिस, तुरुंग, सिंचन, शेती, स्थानिक सरकार, सार्वजनिक आरोग्य, तीर्थयात्रे, दफनभूमी इ. इ. तसेच काही गोष्टी ज्यावर संसद आणि राज्य दोन्ही कायदे करू शकतात,

• शिक्षण, विवाह आणि घटस्फोट, जंगले, वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि पक्षी इत्यादी बाबतीत लोक हिताचे कायदे बनविणे.

• सार्वजनिक उद्याने, बागा, ग्रंथालये, संग्रहालये, विश्रामगृहे, कुष्ठरोग्यांची घरे, अनाथाश्रम आणि महिलांसाठी वसतिगृहे बांधणे आणि त्यांची देखभाल ठेवणे.
रस्त्याच्या कडेला झाडांची लागवड आणि देखभाल
कमी उत्पन्न गटांसाठी घरे, सार्वजनिक प्रदर्शने, सार्वजनिक करमणूक आयोजित करणे;असे अनेक विषय हातात घेऊन हे उपक्रम राबविणे.

• शुद्ध व निरोगी पाण्याचा पुरवठा
सार्वजनिक रस्त्यांचे बांधकाम आणि देखभाल
प्रकाश आणि सार्वजनिक रस्त्यावर पाणी पिण्याची सोय
सार्वजनिक रस्ते, ठिकाणे आणि गटारे साफ करणे
आक्षेपार्ह, धोकादायक किंवा नियमबाह्य/अनैतिक व्यापार पद्धतींचे नियमन, सार्वजनिक रुग्णालयांची देखभाल
प्राथमिक शाळा, स्थापना व देखभाल जन्म आणि मृत्यूची नोंदणी, सार्वजनिक रस्ते, पूल आणि इतर ठिकाणचे अडथळे हटवणे. रस्त्यांना नावे देणे

• विधानसभा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवते आणि सरकारद्वारे दिलेली बजेट मंजूर करावी लागते आणि प्रशासनाच्या व्यवसायासाठी पैसे पुरेसे आणि उचितपणे दिले जातात याची खात्री करावी लागते.आमदारांची प्रमुख दुसरी महत्वाची भूमिका आर्थिक जबाबदारी आहे.

• कार्यकारी जबाबदाऱ्या : विधानमंडळाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ही देखरेख ठेवली जाते. कार्यकारी कार्यवाही करणाऱ्या सर्व कार्यक्रम आणि योजनांवर देखरेख ठेवण्याची आणि तिचे निरीक्षण करण्याचे काम आमदार करतात.उदाहरणार्थ, आमदार फक्त लाभार्थी यादी आणि घरे मंजूर करणाऱ्या समित्यांवर बसतात आणि स्थानिक क्षेत्र विकास निधी कसा खर्च करतात हे निर्धारित करतात. सरकारची कार्यकारणी शाखा जबाबदारीने, पारदर्शकपणे, निःपक्षपातीपणे आणि राजकीय कार्यकारिणीच्या निर्णयांच्या आधारे याची खात्री करुन घेण्याची आमदारांकडून कामाची जबाबदारी असते .

editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *