औसा : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा चौरस्ता येथील विठ्ठल बिरुदेव मंदिर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे दरवर्षी येथील विठ्ठल बिरदेव मंदिरामध्ये बलिप्रतिपदा म्हणजे दीपावली पाडव्यानिमित्त भव्य यात्रा भरते या यात्रे निमित्त विठ्ठल बिरुदेव मंदिरास औसेकर भक्तांचे मानाचे बाशिंग चढविले जाते शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवत औसा येथील बिरुदेव भक्त हे मानाचे बाशिंग पायी चालत घेऊन जाण्याची परंपरा आहे दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता औसा शहरातील भाविक भक्तांनी विठ्ठल बिरू देवाचं चांगभलं आणि येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करीत औसा शहरातील मुख्य रस्त्यावरून मानाच्या बाशिंगाची मिरवणूक पारंपारिक धनगरी ढोल वाद्याच्या निनादात काढून केला मैदाना वर पायी बाशिंग घेऊन जाणाऱ्या भक्तांना निरोप दिला. उमरगा विठ्ठल बिरुदेव मंदिरास औसा येथील मानाचे बाशिंग चढविल्यानंतर कर्नाटक राज्यातील विजापूर येथील बाशिंग चढविले जाते मंदिर परिसरात रात्री छबिना मिरवणूक निघते नंतर बिरूदेवाचे पुजारी अंगात येऊन शेतीभाती पशुधन आणि मानव जातीचे भविष्य वर्तविण्याची परंपरा असून येथे वर्तविलेले भविष्य तंतोतंत खरे ठरते अशी ख्याती आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील हजारो भाविक भक्त या यात्रेत भक्तिभावाने सहभागी होतात.

- November 5, 2024
0
16
Less than a minute
You can share this post!
editor